मुंबई बद्दल बोलायचं म्हटलं तर कळत नाही नेमकं कुठून सुरवात करू? मुंबईन दिल काय मला? साध सरळ आयुष्य होत माझं सांगली मधल. शाळा, कॉलेज, मित्र-मैत्रिणी, सगळं काही व्यवस्थित तर चालू होत. कमी नव्हती कशाचीच. पण म्हणतात ना, आयुष्य हे Signal सारखं असत. कधी Green Signal तर कधी Red. सतत Green Signal ची अपेक्षा करणच व्यर्थ आहे.
तसंच काहीस झालं आयुष्यात, आयुष्याच एक वळण मुंबई मध्ये येऊन थांबलं. पण ज्या वळणावर फुलांच्या पायवाटेची स्वप्न पहिली होती, तिथं काटेरी पायऱ्यांची चढण लागली एकापाठोपाठ एक. इतका त्रास, इतकी दुःख कधी पाहिलीच नव्हती. त्या मानानं सांगली मधलं आयुष्य खूप सुखी होत, सुरक्षित होत. या दुःखातून स्वतःला कस बाहेर काढू म्हणेपर्यंत दुसरं दुःख समोर उभं राहायचं. आयुष्यातले असे कितीतरी न मोजता येण्यासारखे दिवस आहेत कि त्या वेळी फक्त आणि फक्त अश्रू होते सोबतीला. 7-8 महिने तरी याच Depression मध्ये घालवलेत कि या सगळ्यातून कधी बाहेर तरी पडू शकेन कि नाही, पण Show Must Go On. अर्थात हा Show नसून हि Life आहे हे तोपर्यंत कळून चुकलेलं. ज्यांनी त्रास दिला त्यांना काही न वाटता ते निवांत जगत आहेत. मग मी का स्वतःला त्रास करून घ्यावा? If I Am Not Guilty Then Why Should I Worried About What Happened?
आणि त्या वेळी एक Positive Source आला Life मध्ये, ज्यानं माझं Life पूर्णपणे बदलून गेलं. मी व्यर्थच Negativity चा Red Signal आयुष्यात आणून ठेवला होता. I Am Not A Looser To Give Up.
I Left That Past. तो भूतकाळच पुसून टाकला मी आयुष्यातून. वहीची नको असलेली पान वहीतून काढून टाकतो ना आपण तसं. पुन्हा जी पान बघावीच लागणार नाही आहेत ती वहीत ठेवून फायदा तरी काय? जर कोणी माझ्या Life चा Part असणं Deserve च करत नसेल तर असे लोक Life मधून गेल्यावर उलट चांगलंच आहे कि. Infact माझं Life Happy झालं असे लोक गेल्यावर Life मधून. नव्या आयुष्याची सुरवात झाली माझ्या. एक खूप छान आयुष्य. स्वतःचीच नव्यानं ओळख झाल्यासारखी मी स्वतःला नव्यानं भेटले. मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळाला तेव्हा. आपण स्वतःच्या हिमतीवर सगळं काही करू शकतो हि भावनाच इतकी सुंदर होती कि मग पुढचं सगळं आपोआप सुंदर होत गेलं. माझ्या Positive Source न मला हे पटवून दिल कि Never Give Up.

आधी सगळ्या गोष्टीत Negative विचार करणारी मी, आता प्रत्येक गोष्टीचा Positively विचार करायला शिकले. एकटीनेच संध्याकाळी तळ्याकाठी फिरायला जाणं. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या मुसळधार सरी बघत Enjoy केलेली मस्त Coffee, एकटीनं रमत गमत केलेली ती Shopping सगळं काही आता हवंहवस वाटू लागलं होत. I Am A Confident & Independent Girl Now. हा सगळा बदल कसा झाला? Just Because Of My Positive Source. जेव्हा पूर्णपणे Depression मध्ये होते त्यातून बाहेर येण्यासाठी एक जुना छंद पुन्हा नव्यानं लावून घेतला स्वतःला. “वाचन”. पहिल्यापासून वाचनाची आवड होती पण इथे आल्यापासून जे काही बरे वाईट प्रसंग घडले ना, तेव्हापासून हा छंद पण निसटला होता हातातून. जो कितीतरी दिवसांनी मी पुन्हा जोपासला. आणि या वाचनातूनच मिळाला मला माझा Positive Source. "कर्ण"…."राधेय". सर्वांसाठी जरी तो महाभारतातील एक पात्र असला, तरी माझ्यासाठी तो माझा माझा Life Source आहे. माझ्या जगण्याचा स्त्रोत आहे.
त्याची किती पुस्तक वाचली असतील याची गणनाच नको करायला, पण तरीही प्रत्येक पुस्तकातून तो मला नव्यानं भेटला. नव्यानं काहीतरी देत राहिला. माझं आयुष्य मला परत मिळालं त्याच्या रूपानं. त्यानं शिकवलं कि आयुष्यात कधीही हार नाही मानायची. दुःख येतात ती आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातात. प्रत्येक दुःखात माणसाची कसोटी लागते आणि ती कसोटी माणसाला अजूनच महान बनवते. माझ्या आयुष्याचा खरा अर्थ मला कर्णान दिला. आयुष्य जगायला शिकवलं राधेयान. आज मी जे काही आहे त्या सर्वाचं श्रेय फक्त आणि फक्त कर्णाला जात. आजही 3 वर्ष मागे पाहिल्यावर मला ती वृषाली कुठेच दिसत नाही, जी आता आपलं काही भल होणार नाही म्हणून रडत बसली होती. I Just Changed A Lot.
मुंबईन काय दिल? मुंबईन एक असा Source दिला ज्यामुळं मी आत्मविश्वासानं जगायला शिकले. खडतर परिस्थितीमध्ये लढायला शिकले. Yes I Am Free, I Am Independent & I Am Happy Now, खूप छान आयुष्य आहे आता माझं. माझा Job, माझी माणसं, आणि प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत माझी साथ देणारा राधेय. आधी जेव्हा कोणीही विचारायचं कशी आहे मुंबई? एकच उत्तर असायचं माझं, आयुष्य Spoil केलं मुंबईन माझं. But Now . . . . . I Must Say Honestly,

ज्यामुळं आयुष्य बदलून गेलं असा माझ्या जगण्याचा Source दिला Metro City न,
ज्यानं मला ताठ मानेन जगायला शिकवलं,
प्रत्येक संकटांचा सामना करायला शिकवलं,
आयुष्याच्या कोणत्याच वळणावर त्यानं माझी साथ कधीच सोडली नाही,
माझ्यातल्या मी पणाची जाणीव करून दिली, आणि सगळ्यात महत्वाचं ,
आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं मला कर्णान. खूप Happy आहे आता मी माझ्या Life मध्ये. प्रेम करायला शिकले नव्यानं आयुष्यावर . . .

. . . . . Love You Zindgi . . . . .
© वृषाली
Such a nice blog😎
ReplyDeleteM your fan..can I have ur autograph
ReplyDelete