भय इथले संपत नाही ही कवि ग्रेस यांची माझी अतिशय आवडती कविता. कवितेचा अर्थ ग़ूढ आहे, पण ती जितकी समजुन घेत जाते तितकी नव्यानं या कवितेच्या प्रेमात पड़त जाते. कवि ग्रेस यांना दुःखाचा महाकवी म्हणतात, त्यांची कविता समजुन घ्यायची म्हणजे अगदी त्याच दुःख- वेदनेच्या पातळीवर जाऊन त्याना समजुन घ्याव लागेल. मी काही त्यांच्या इतकी मोठी कवयित्री नाही पण मला त्यांच्या कविता खूप आवडतात म्हणून मी माझ्या परीनं या कवितेच्या चार ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. हा माझा प्रयत्न माझ्या प्रिय कविला मी वाहिलेली छोटीशी मानवंदना आहे.
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते . . . . .
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते . . . . .
एकाकी असलेल्या माझ्या जगामध्ये आता फक्त दुःख उरले आहे, अन या दुःखाचे भय कधीही न संपणारे आहे. अशा वेळी मला तुझी आठवण येते आणि तुझ्या आठवणीत माझ्या एकाकीपणाची दुःख घालवण्यासाठी मी गाणी गातो, ती गाणी जी तू मला शिकवलीस, एका परीनं त्या गाण्यांच्या रूपात मी तुला आठवत राहतो. माझा एकाकीपणा कमी करायचा एक निष्फळ प्रयत्न मी करतो.
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया . . . . .
.
धरती वर पडणारे चांदण्यांचे झरे, ते नुसते झरे नाहीत तर निद्रिस्थ पृथ्वीला पडलेली शुभ्र शीतल स्वप्नांची माळा आहे. या धरतीची माया देखील विलक्षण आहे, आपली सुख-दुःख, आनंद-अश्रू , सगळं काही सहज सामावून घेते ती. त्याच मातीत आता मला मिसळायचे आहे, जिथं आपली सुख दुःख एकरूप झाली त्याच मातीत पुन्हा उगवण्यासाठी मला पुन्हा तीत मिसळायचे आहे. त्या धरतीच ऋण थोडस का होईना उतराई व्हायचं आहे आता.

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला . . . . .
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला . . . . .
तुझे ते हळुवार बोल, अवघ जीवन भरून गेलंय माझं त्या बोलांनी. वनवासात असलेल्या सीतेला रामाच्या शेल्याची सोबत होती. त्या शेल्याच्या रूपात ती जणू श्रीरामालाच पाहत होती. तिच्या एकाकी पणात देखील कुठे ना कुठे श्रीराम होते. अगदी तसेच माझ्या एकाकीपणात तुझ्या शब्दांची, तुझ्या बोलांची मला सोबत आहे, माझ्या एकटेपणाच दुःख काहीस त्या सीतेसारखंच आहे, तुझ्या शब्दांनी मात्र आयुष्य व्यापून गेलय माझं. त्यांचीच सोबत उरलीय आता.
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे . . . . . .
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे . . . . . .
एखाद्या भाविकान अखंड ईश्वराचा जप करावा, त्याची स्तोत्र गावीत त्याप्रमाणे मी देखील माझीच दुःख आळवत असतो, कधी मूक अश्रूंच्या रूपात, कधी अबोल अव्यक्त शब्दात ती व्यक्त करत राहतो, पण त्या दुःखाच्या गडद काळोखातही तुझ्या आठवणींचा चांदणप्रकाश माझ्या सोबत असतो. ते चांदणे कधीही माझी साथ सोडत नाही. प्रत्येक क्षणात तूच असल्याचा भास सतत करून देत ते, त्या चांदण्यांप्रमाणेच तुझ्या आठणीही कधीही न संपणाऱ्या आहेत. . . .
© वृषाली